कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत
- दोन अंकी संख्येला 11 ने गुणल्यास गुणाकार तीन अंकी संख्या येतो मात्र 91 ते 99 दरम्यान च्या संख्यांना 11 ने गुणल्यास गुणाकार चार अंकी संख्या येतो.
- दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करताना दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक एकक स्थानी ठेवावा व दशक स्थानचा अंक शतक स्थानात ठेवावा .
उदा .54 x 11 = 5 _ 4
- आता दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज करावी व तो अंक उत्तरात दशक स्थानी लिहावा .
उदा. वरील उदाहरणात 5 + 4 = 9
54 x 11 = 5 9 4
- आणखी उदाहरणे :
63 x 11 = 6 9 3
42 x 11 = 4 6 2
27 x 11 = 2 9 7
- जर दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज दोन अंकी येत असेल तर येणाऱ्या बेरजेचा एकक स्थानाचा अंक उत्तरात दशक स्थानी ठेऊन बेरजेचा दशक स्थानचा अंक उत्तरातील शतक स्थानच्या अंकात मिळवावा.
- उदा . 67 x 11= 6 _ 7
पण 6+ 7=13
म्हणून
67x11= 6 13 7
13 मधील 1 , शतक स्थानाच्या 6 मध्ये मिळवूया .6+1=7
67 x 11 = 7 3 7
- आणखी उदाहरणे :
85 x 11 = 9 3 5
69 x 11 = 7 5 9
99 x 11 = 1 0 8 9
94 x 11 = 1 0 3 4
अशा प्रकारे कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने सहज गुणाकार करता येतो .
No comments:
Post a Comment