https://sadanandsonawane.blogspot.com या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

संग्रहित लेख

 

   संग्रहित लेख   ☆


💞आत्मविश्वासाचे गुपित काय?💞

मानसशास्रतज्ञ डॉ. शिरीष राजे यांचा एक फारच सुंदर लेख माझ्या वाचनात आला आहे, या प्रश्नाचे उत्तरासाठी तो येथे शेअर करीत आहे.लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?”माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.”मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का?शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते?धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं? – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!तेच जेआरडी टाटा म्हटलं की - पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये?जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल!ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?ह्या लोकांपेक्षा असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं!बिलीफ सिस्टीम!तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासुन बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी बनुन जगतो, केवळ त्याच्या बिलीफ सिस्टिम मुळे!आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयशं आपल्याला असं भासवतात, की आपण दुर्बळ आहोत, पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो.बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो,समजा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी एका कार्यक्रमात गेला आहेत, जेवणे चालु आहेत वाढण्यात तुम्हीही त्या परिवाराला मदत करत आहात आणि कोणीतरी सांगतं,“जा बरं, किचनमधुन तेवढं मीठ घेऊन ये!”तुम्ही किचन मध्ये जाता, पण मनात विचार येतो, “इथे मी नवीन आहे,मला यांच्या घरातलं मीठाचं भांडं कसं सापडेल, बरं?”अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मीठाचं भांडं दिसतच नाही, आपण रिकाम्या हाताने वापस आलेलं पाहुन ती व्यक्ती म्हणते, “अरे समोरचं तर ठेवलेलं आहे, ”आणि आपल्या हाताला धरुन ती किचन मध्ये येऊन भांडं दाखवते, आणि मीठाचं भांडं एकदम समोरच असतं,”आपल्याला ते आधी सापडत नाही कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते, की “मला ते सापडणार नाही आणि आपलं अंतर्मन अगदी तसचं घडवतं.”बिलीफ सिस्टीम माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते किंवा त्याची  धुळधाण तरी करते,चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे, ‘माझ्याकडे काय नाही’, हे न पाहता, ‘माझ्याकडे काय काय आहे?’ याचा विचार करणं!रजनीकांत कंडक्टर होता, त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागोमटा, लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे स्टाईल आणि डायलॉग डिलीव्हरी होती, त्याने त्याच्यावर फोकस केला आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे. ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल होतात.अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुझा हिरो बनण्यातला अडसर आहे. अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही त्याने स्वतःला विचारलं माझ्याकडे काय चांगलं आहे? त्याने असा काही आवाज कमवला दोन मिनीटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात.जेफ बेजोस असो वा जेक मा, स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेटस.नारायण मुर्ती असो वा नरेंद्र मोदी.दिपीका पदुकोन असो वा माधुरी दिक्षीत. महेंद्रसिंग धोनीपासुन संदीप महेश्वरी पर्यंत.स्वामी विवेकानंदांपासुन, विवेक बिंद्रांपर्यंत.कोणतही, तुमच्या फेव्हरेट असलेलं कोणतंही कॅरॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणुन बघा,त्याच्या यशाचं उत्तर तुम्हाला त्याच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल.तर मित्रांनो,यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीतही ही बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खुप मदत करते, किंवा आपल्या मार्गात आडवी येते,ज्याचा बिलीफ खुप सशक्त आहे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते.असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार मी माझ्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले आहेत,आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडतानाही पाहतो आहे,तुमची बिलीफ सिस्टीम कशी आहे? ती तुम्हाला साथ देते की नाही? का तीच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात?लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्वलायजेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलवण्यासाठी उपयुक्त आहेत.ज्याची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग...त्याला या जगात अशक्य असे कांहीच नाही.... तुमची बिलीफ सिस्टीम उतुंग भरारी घेवो यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !....धन्यवाद !---🙏🙏🙏🙏--------


 

                  ‌‌‌‌  *‌‌धैर्यवान*

  *एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली* 

  *मुलानो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो.तो पर्यंत  तुम्ही  तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत. असे सांगून  ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले.*
 *वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मुल त्यांच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न  करीत होते.दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आढावा घेतला.  संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात  चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती.  शिक्षकाने  गुपचुपपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदविली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखविली.या शिक्षकाचे नाव होते प्रोफेसर वॉल्टर मिशेल*

 *बऱ्याच वर्षानंतर, प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.  दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली  की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत.मग प्रोफेसर वाल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चाॅकलेटस् खाल्ली होती त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते.* 

 *या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य  होते*.

 *"जो माणूस दहा मिनिटे धीर धरु शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही."*

*या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला "मार्श मेलो थिअरी" असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चाॅकलेटचे नाव "मार्श मेलो" होते. ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते.*

*या सिद्धांतानुसार,जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धीर धरणे हा गुण विषेशत्वाने आढळतो. कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्वाचा धनी असतो.*

 *धैर्यवान असणे हे जीवनाचे सार आहे.*.
 *आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी धीर धरा ....*
*कारण ज्याच्याकडे धीर धरणे हा गुण आहे तो नक्कीच विलक्षण व्यक्तिमत्वाचा धनी असतो....*
                                                                                                     (साभार)

No comments:

Post a Comment