https://sadanandsonawane.blogspot.com या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Good Thoughts (सुविचार)

❤ सुविचार संग्रह ❤

     काम छोटे की मोठी ते महत्त्वाचे नाही ते वेळच्या वेळी करणे महत्त्वाचे.

    ➡हातांनी पायांना विचारलं ,"सर्वजण तुमच्यावर डोके ठेवतात आमच्यावर का नाही? ", पायांनी उत्तर दिलं त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं....... हवेत नाही.

       आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसं "घाबरट"नाही तर समजूतदार असतात.

    लोक  तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे .पण  तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात हे मात्र तुमचे कर्म आहे .त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा .कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल .तुम्हाला काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दु:ख करून घेऊ नका .


 *स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो...!!!* *तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं...!!!**वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो...!!! 


*मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे, चांगलं वागणं कधीच सोडू नका...!!!**कारण**ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे...!!!*

➡  पंख छाटलेला पक्षी आणि मजबुरीने वाकलेली ,दबलेली व्यक्ती कधीच भरारी घेऊ शकत नाही 


➡    वाईट कोणीच नसते ,जीवनात अशी पण वेळ येते कि माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो .


➡ सुंदर असण महत्वाचे नसते !पण कोणासाठी महत्त्वाचं असण सुंदर असत .


➡ अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा  विश्वास.......जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो ,सगळं व्यवस्थित होईल .



➡ जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यत तुम्ही चांगले असता ,ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता .!


➡ यशस्वी  होण्यासठी कधीही उशीर झालेला नसतो .त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका .


जो काम करतो ,चुका त्याच्याकडूनच होतात ,रिकामटेकड्या लोकांचे संपूर्ण आयुष्य  दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच जात .


➡ दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे  त्याचाही आनंद मिळत नाही .


➡ यशस्वी  व्हायचं  असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते ,जेंव्हा तुम्ही जिंकू लागता ,तेंव्हा लोक आपोआप  तुमच्या  मागे येतात .


तुम्हाला धनाचे रक्षण करावे लागते  पण  ज्ञान  तुमचे रक्षण करते .



  

1 comment: