https://sadanandsonawane.blogspot.com या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Maths

दिनदर्शिका

 एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी. परीक्षेत कालमापन किंवा दिनदर्शिकेवर प्रश्न विचारलेच जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अवघड वाटतात. मात्र खालील नियमांचा योग्य अभ्यास केल्यास आपण कमी वेळात अचूक प्रश्न सोडवू शकतो.
सामान्य वर्ष :-

1)
एकूण दिवस 365 म्हणजे एकूण आठवडे 52 + 1 अधिक दिवस.

2)
सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 1 दिवसांनी पुढे जातो.
1
जानेवारी 1997 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 1998 ला बुधवार असेल.

3)
सामान्य वर्षांत फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. सामान्य वर्षांत फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो.
उदा. 4 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार असेल तर 4 मार्च 2007 ला मंगळवारच असेल.

4)
सामान्य वर्षांत 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात.

5) 30
दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार दोन दिवसांनी तर 31 दिवसांच्या महिन्यांनंतर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार तीन दिवसांनी पुढे जातो.

6) 1
जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला असतो.

लीप वर्ष :-
 
1)
ज्या वर्षांला 4 ने नि:शेष भाग जातो आणि ज्या वर्षांच्या शेवटी दोन शून्य असल्यास 400 ने नि:शेष भाग जातो ते लीप वर्ष होय.
उदा. 1980,1996, 2000,1600 . परंतु 1800 लीप वर्ष नाही 
.
2)
लीप वर्षांत एकूण 366 दिवस असतात. तसेच 52 आठवडे + 2 अधिक दिवस.

3)
लीप वर्षांत 2 दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 2 दिवसाने पुढे जातो. उदा. 1 जानेवारी 2004 गुरुवार तर 1 जानेवारी 2005 गुरुवार + 2 = शनिवार

4)
लीप वर्षांत 1, 2 जानेवारीचे वार वर्षांत 53 वेळा तर इतर वार 52 वेळा येतात.

5) 1
जानेवारीला जो वार असतो, त्याचा पुढील वार 31 डिसेंबरला असतो.

6) 7
दिवसांचा एक आठवडा असतो, म्हणून प्रत्येक आठवडय़ाने तोच वार पुन्हा येतो.

उदा. 1 तारखेला जो वार तोच वार 8, 15, 22, 29 तारखेला येतो.
संपूर्ण वर्षांतील जादा दिवस :






तारखेवरून वाराचा शोध


सूत्र : शतकाचा अंक + वर्षाचा अंक +महिन्याचा अंक +तारीख भागिले 7 
शतकाचा अंक –

२० वे शतक – ०

२१ वे शतक -६

२२ वे शतक -४

२३ वे शतक -२

२४ वे शतक -०

२५ वे शतक – ६ याप्रमाणे क्रमशः

वर्षाचा अंक

वर्षाचे शेवटचे दोन अंक +त्या दोन अंकाची १/४ करून येणारी पूर्णांक संख्या 

महिन्याचा अंक –

जाने-१ फेब्रु-४ मार्च -४ एप्रिल-० मे-२ जून -५ जुलै-० ऑग -३ सप्टे -६ ऑक्ट -१ नोवे-४ डिसे-६

लीप वर्ष आल्यास १ मार्च पूर्वी एकूण बेरजेतून १ वजा करावा बाकी कृती समान.

उदाहरण

२८ मार्च १९८१

शतकाचा अंक + वर्षाचा अंक +महिन्याचा अंक +तारीख भागिल 7 

०+(८१+२०)+४+२८ भागिले ७ =येणारी बाकी =० 
आहे तर शनिवार 

१ असेल तर रविवार ,२ असेल तर सोमवार याप्रमाणे









































No comments:

Post a Comment