https://sadanandsonawane.blogspot.com या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Saturday, October 17, 2020

दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत

कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत

  •          दोन अंकी संख्येला 11 ने गुणल्यास गुणाकार तीन अंकी संख्या येतो मात्र  91 ते 99 दरम्यान च्या संख्यांना 11 ने गुणल्यास गुणाकार चार अंकी संख्या येतो.
  •        दोन अंकी संख्येला 11 ने गुणाकार करताना दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक एकक स्थानी ठेवावा व दशक स्थानचा अंक शतक स्थानात ठेवावा .

   उदा .54 x 11 = 5  _  4

  •      आता दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज करावी व तो अंक उत्तरात दशक स्थानी लिहावा .

उदा. वरील उदाहरणात  5 + 4 = 9

   54 x  11 = 5 9 4

  • आणखी उदाहरणे :

                 63 x  11 = 6 9 3

                 42 x  11 = 4 6 2

                 27 x  11 = 2 9 7

  • जर दिलेल्या  संख्येच्या दशक व एकक स्थानाच्या अंकांची बेरीज दोन अंकी येत असेल तर येणाऱ्या बेरजेचा एकक स्थानाचा अंक उत्तरात दशक स्थानी ठेऊन बेरजेचा दशक स्थानचा अंक उत्तरातील शतक स्थानच्या अंकात मिळवावा.
  • उदा . 67 x 11= 6 _  7

         पण 6+ 7=13

        म्हणून

            67x11= 6  13  7

        13 मधील 1 ,  शतक स्थानाच्या 6 मध्ये मिळवूया .6+1=7

       67 x 11 =  7  3 7

  •  आणखी उदाहरणे :

    85  x 11 = 9  3  5

    69 x 11  =  7 5  9

    99 x 11  =  1 0 8 9

    94 x 11  =  1 0 3 4

अशा प्रकारे कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने सहज गुणाकार करता येतो .